जी निवडणूक बापाने तीनदा जिंकली ती पोराला का जिंकता आली नाही ? भगीरथ भालके पराभवाची कारणे

पंढरपूर : भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी खूप महत्त्वाची असणारी पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप चे समाधान आवताडे यांनी विजयी पताका रोवली त्यामुळे राष्ट्रवादी चे भगीरथ भालके यांना हार पत्करावी लागली. खूप साऱ्या पक्षाची ताकत सोबत असताना भालके यांना पराभव का स्वीकारावा लागला ? त्याची सविस्तर कारणे खाली दिली आहेत.
bhagirath bhalke
bhagirath bhalke loss in pandharpur

माझी आ. भारत नाना भालके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांची जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली.

या निवडणुकीचा निकाल आज लागला यामध्ये भगीरथ भालके यांना पराभव स्वीकारावा लागला.याचे खालील कारणे आहेत. 

ढासळत चाललेला विठ्ठल कारखाना 

भारत नाना यांच्या निधनानंतर विठ्ठल कारखान्याचे सर्व सूत्र भगीरथ भालके यांच्याकडे आले परंतु विठ्ठल कारखाना हा कर्जाच्या बाजारात बुडत चालला होता . या कारखान्याला कर्जातून बाहेर काढण्यासाठी भालके कुटुंबाने खूप प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले. त्यामुळे तेथील कामगार यांचा रोष निर्माण झाला आणि त्याचा फटका भगीरथ भालके यांना बसला आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.भगीरथ भालके यांनीं या आधी फक्त जिल्हापरिषद ची निवडणूक चार वर्षांपूर्वी लढवली होती. पण त्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांचा जनतेशी कमी संपर्क आला. तर दुसरीकडे समाधान आवताडे यांचा बाजूनी जनसंपर्क चांगला होता. त्यांच्या गटाने आधी भरपूर निवडणुका लढवल्या आहेत. त्यांच्याकडे पंचायत समिती ,जिल्हा परिषद,सहकारी संस्था,ग्रामपंचायती आहेत त्यामुळे त्यांचा जनतेशी थेट संपर्क होता त्यामुळे याचा फायदा समाधान आवताडे यांना झाला असा अंदाजही वर्तवला जात आहे.

महाविकास आघाडीच्या कामावर लोकांची नाराजी 

सध्या महाराष्ट्रात कोरोनाची संकट खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे,त्यामुळे याला व्यवस्थित हाताळणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी चे सरकार आहे. कोरोनाच्या काळात राज्यसरकारने जी मदत करायला हवी होती ती केली नाही उलट जास्त लाईट बिल ,कर्जमाफी केली नाही याचा राग सामान्य जनतेच्या मनामध्ये होता. आणि जनतेच्या दुःखावर मीठ चोळण्याचे काम भाजप ने केले त्यामुळे सरकार विरोधी भावना लोकांच्या मनात निर्माण झाल्या आणि त्याचा फटका भगीरथ भालके यांना पंढरपूर च्या पोटनिवडणुकीत बसला

आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नक्की कळवा 👇

أحدث أقدم