अजित पवार यांचा आ.नीलेश लंके यांना फोन नीलेश तू अस करू नको ..

 अजित पवार यांचा आ.नीलेश लंके यांना फोन

सध्या महाराष्ट्रात जिकडेतिकडे आमदार निलेश लंके यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे आमदार निलेश लंके यांच्या कोविड  सेंटर बाबत अजित दादा पवार यांना पूर्वीच कल्पना होती आमदार निलेश लंके हे थेट रुग्णांशी संवाद साधत असल्याचे वृत्तवाहिनीवर पाहिल्यानंतर अजित दादा यांनी  निलेश लंके यांना फोन केला अजित पवार म्हणाले रुग्णांची सेवा करतोय यात आनंद आहे मात्र सामाजिक अंतर, मास सॅनिटायझर यांच्या  वापराकडे दुर्लक्ष होतंय स्वत कडे लक्ष देत जा तुझ्या जनतेसाठी तुझे  आरोग्य ठणठणीत असले पाहिजे असा सल्लाही अजितदादा यांनी दिला आहे.  मी काळजी घेत असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगून सावरासावर करण्याचा प्रयत्न केला असता अजितदादा म्हणाले कशाचे काय सकाळपासून दहा वेळा तुझा व्हिडिओ पाहायला हवी तेवढी काळजी घेत नाहीस तुझे तुझ्या जनतेवर प्रेम आहे हे मान्य मात्र त्यांची काळजी घेता घेता तुझी ही काळजी घे असे सांगतात काही मदत असेल तर सांग असंही अजित दादा पवार यांनी निलेश लंके यांना सांगितला आहे. 


सामान्य माणूस लाथ मारेल तिथं पाणी काढू शकतो हेच दाखवून दिले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी सामान्य माणूस आमदार झाला की काय करू शकतो हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा खिशात एक रुपया नसताना कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना तब्बल 11 सेंटर उभारण्याची किमिया आमदार निलेश लंके यांनी केली  लिए. 


या सेंटरला तब्बल पाच देशातून मदत येत आहे  फ्रान्स इंग्लंड ऑस्ट्रेलिया दुबईतून या महाराष्ट्रातील कोविंड सेंटरला मदत येतीये आत्तापर्यंत तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांची मदत covid-19 सेंटरला झाल्याचं लंके यांनी सांगितले या कोविड  सेंटर मध्ये रुग्ण दाखल होण्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंत सर्व देखबाल करण्यात येते .  रुग्णांसाठी औषधांसोबत पौष्टिक आहार देखील दिला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे मायेने विचारपूस केली जाते तेही स्वतः आमदार निलेश लंके करतात.  आणि ते स्वतः या कोरोंना  रूग्णालयात रुग्णासोबत राहतात  तिथं झोपतात आणि जेवतातही तिथंच लंके यांचा काम पाहून अनेक रुग्णांच्या डोळ्यात अश्रु येतात तर स्वतःला मुलगा देखील इतकी सेवा करू शकत नाही मात्र निलेश लंके आमची दिवस-रात्र काळजी घेतात अशा भावना काही महिलांनी व्यक्त केल्यात.  

सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले निलेश लंके हे लोकवर्गणीतून आमदार झाले  लहानपणापासूनच समाजसेवेची आवड इतरांना नेहमी मदत करण्याची वृत्ती हे सर्व काम करत असताना ते ग्रामपंचायतीतील सरपंच झाले आणि थेट आमदारा पर्यंत त्यांनी मजल मारली.  हे सगळे  शक्य झालं इच्छाशक्तीमुळे.  नाही राजकारणाचा वारसा, नाही कोणत्याही पक्षावर टीका नाही, सेवा हा उद्देश असा राजकारणी अहमदनगर मिळवला.  أحدث أقدم