देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला | गृहमंत्री दिलीप वळसे पाटील | marathi News Live

शनिवारी कोरोना रुग्णासाठी वापर होणाऱ्या रेमडेसीवीर वरून चांगले राजकारण तापले आहे. पोलिसांनी यासंबंधी ब्रूक फार्मा कंपनीचे मालक यांना ताब्यात घेतले आहे .
त्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काही सहकार्यासोबत विर्ले पार्ले पोलीस स्थानकात दाखल झाले होते. त्यामुळे सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाही होण्याची शक्यता आहे.

 

त्यांनतर महाराष्ट्र राज्याचे ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाही व्हावी अशी मागणी केली आहे. नंतर वळसे पाटील बोलले की महाराष्ट्रात 50 हजार इंजेक्शन येणार असल्याची माहिती मिळाली होती.


त्यामुळे ब्रूक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशी साठी बोलावले होते. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी दिवशी रात्री पोलीस स्थानकात येऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यावर चर्चा करून कारवाही करू असेही वळसे पाटील बोलले. 

अशाच प्रकारच्या मराठी बातम्या साठी खलील लाईक बटन  दाबा 👇

Post a Comment

Previous Post Next Post