संजय राऊत यांनी माझा छळ केला ! स्वप्ना पाटकर यांनी केले गंभीर आरोप

महाराष्ट्रात महाविकास आघाडी मधील अनेक नेत्यावर सध्या आरोप होताना दिसत आहे. आधी संजय राठोड नंतर धनंजय मुंडे ,अनिल देशमुख आणि आता शिवसेनेचे संजय राठोड.


बाळकडू चित्रपटाची निर्माती डॉ. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की गेल्या 8 वर्षांपासून संजय राऊत माझा छळ करत आहेत. त्यांनी माझ्या नातेवाईकांना मारहान देखील केली आहे. ते जे बोलतात ते मी करायला पाहिजे आणि नाही केले तर कोणत्या ना कोणत्या प्रकणात मला अडकवण्याचा प्रयत्न ते करतात.
मी यापूर्वी अनेक वेळा तक्रार केली आहे पण माझी तक्रार कोणी गांभीर्याने घेत नाही त्यामुळे आपण मला न्याय द्यावा असे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. 


या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रीया कमेंट मध्ये नक्की कळवा 

Post a Comment

Previous Post Next Post