शरद पवार यांना अनिल देशमुख यांचा राजीनामा का नकोय | sharad pawar | hm anil deshmukh | Letest marathi news

शरद पवार यांना अनिल देशमुख यांचा राजीनामा का नकोय  | sharad pawar | hm anil deshmukh | Letest marathi news 

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलीस खात्यावर वेगवेगळ्या प्रकरणामुळे प्रश्न चिन्ह उपस्थित राहिले आहेत.
वरिष्ठ ips अधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप करणं तक्रार करणं देशात आतापर्यंत कधीच झालेल नाहीय 

मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग म्हणाले की गृहमंत्र्यांनी वसुलीचा शंभर कोटींच टार्गेट दिल होत.
सचिन वांझे आणि त्यांची भेट सुद्धा झाली होती.

अंटेलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरण अशा राज्यात दोन मोठ्या घटना घडल्यानंतर पोलीस खात्यातील आतल्या गोष्टी बाहेर यायला सुरुवात झाली .त्यामुळे साहजिकच ग्रहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी पण होणारच ,त्यासाठी भाजप ने राज्यभरात आंदोलन सुरू केले.

अनिल देखमुख यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असताना अनेक बैठका सुद्धा पार पडल्या .अनेक वेळा असंही जाणवले की अनिल देखमुख यांचा राजीनामा घेतला जातोय ,अनिल देशमुख यांच्याबाबत चा निर्णय दोन दिवसात होईल.अस शरद पवार आधी म्हणाले होते. पण अचानक शरद पवार यांनी अस घोषित केले की अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाहीय ,अनिल देखमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाहीय, अशी भूमिकाच शरद पवार यांनी घेतली. त्यामुळे शरद पवार यांना अनिल देशमुख यांचा राजीनामा का नकोय अशी चर्चा सुरू झाली.विरोधक आक्रमक झालेत अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केलेत तरीही ग्रह मंत्र्यांना शरद पवार का पाठीशी घालत आहेत असा प्रश्न उपस्थित होतो . त्यामागची 5 कारण आज आपण जाणून घेऊयात. त्यातील पाहिले आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पक्षाची प्रतिमा. जर या सर्व प्रकरणावर अनिल देशमुख  यांचा राजीनामा घेतला तर त्याचा थेट परिणाम राष्ट्रवादी च्या प्रतिमेवर होऊ शकतो.


राजीनामा घेणं हे दोषी असल्याचं लक्षण मानलं जातं ,जर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला तर त्यांच्यावरचे आरोप हे खरे आहेत हा संदेश महाराष्ट्रात जाईल.
आणि याचा थेट परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षावर होईल. />दुसरे कारण : दुसरे कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकार ,राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे, अस असताना विरोधकांनी अनेक मंत्र्यांवर आरोप केले . सरकार मधील अनेक मंत्री कोणत्या ना कोणत्या आरोपामुळे अडचणीत सापडले आहेत. वीस दिवसांपूर्वी ठाकरे सरकार मधील एका मंत्र्यांचा राजीनामा आला होता ते म्हणजे शिवसेनेचे संजय राठोड यांनी राजीनामा दिला होता.जर 20 दिवसात 2 मंत्र्यांनी राजीनामा दिला तर नक्कीच सरकारची प्रतिमा खाली जाऊ शकते.


यामध्ये तिसरे कारण म्हणजे विरोधकांचा विजय महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजप सत्ताधाऱ्यावर वरचढ असल्याचं दिसून येत.त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाकडे मोठे आवाहन आहे ते म्हणजे विरोधकांना रोखणे. विरोधक हे प्रत्येक मुद्यावर सरकारला व्यवस्थित धारेवर धरून व्यवस्थित मुद्यावर हात घालत आहेत. त्यामुळे जर ग्रह मंत्री यांच्यावर आरोप होऊन ते सिद्ध झाले तर यामध्ये ठाकरे सरकारची बदनामी आणि विरोधी पक्षाचा विजय होईल. त्यामुळे शरद पवार यांना अनिल देशमुख यांचा राजीनामा नकोय. 

आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद 

©Royal Patil

Post a Comment

Previous Post Next Post