नरेंद्र मोदी खरच बांगलादेश साठी तुरुंगात गेले होते का ? | Narendra modi jail

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश मध्ये एक विधान केल. त्या विधानाची देशभरात चर्चा झाली त्यावरून वाद सुद्धा रंगला . बांगलादेशात स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो अस ते विधान होत . नरेंद्र मोदी हे बांग्लादेशात स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्ण उत्सहानिमित्त खास कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेव्हा ते बोलले की बांगलादेश चे स्वातंत्र्य आंदोलन हे माझ्या जीवनातील पाहिले आंदोलन होते. तेव्हा माझे वय 20_22 वर्ष असेल 


जेव्हा मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी बांगलादेश देशाच्या आजादी साठी सत्याग्रह केला होता. बांग्लादेशाच्या स्वातंत्र्याच्या समर्थनात मी तुरुंगात पण गेलो होतो . त्यानंतर विरोधकांनी त्यांच्या या वाक्यावर टिपणी करायला सुरू केली.

विरोधी नेते बोलायला लागले की मोदीजी अजून किती फेकणार अशी टीका काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. काँग्रेस कडून थेट माहिती अधिकार अंतर्गत मोदी यांनी केलेल्या दाव्या संदर्भात माहिती मागवण्यात आली आहे. 

पण खरंच मोदी बांगलादेश साठी तुरुंगात गेले होते का ? बांग्लाादेशाच्या स्वातंत्र्या साठी सत्यााग्रह झााला होता का असा प्रश्न आता सर्वांना पडला असेल twitter वर या बाबत आता काही दावे केले जात आहेत आणि पुरावे सुद्धा दिले जात आहेत.  Bjp gujrat ने ट्विट मध्ये नरेंद्र मोदी यांच्या संघर्ष मा गुजरात या पुस्तकाचा उल्लेख केला आहे . त्यात असा उल्लेख आठळतो की मोदी हे बांगलादेशात सत्याग्रहात सहभागी झाले होते. आणि तिहार तुरुंगात सुद्धा गेले होते, हे पुस्तक 1978 साली प्रकाशित झाल्याचं सांगितलं जातंय . तर असा सत्याग्रह खरच भारतात झाला होता का ? यावर चर्चा होत आहे . त्याबद्दल चे काही वर्तमान पत्राचे संदर्भ समोर येत आहेत 1971  साली ऑगस्ट महिन्यात 12 दिवसांचा बांगलादेश साठी सत्याग्रह भारतात झाला होता. जनसंघाने हा सत्याग्रह सुरू केला होता. त्यावेळी जनसंघाचे हजारो कार्यकर्ते यात सहभागी होते आणि यात दहा हजार जनसंघाच्या कार्यकर्त्यांना अटक ही झाली होती.

त्यात बाराशे महिला सुद्धा होत्या अस Times of india ने तेव्हा छापून आणलं होतं. जनसंघान त्या काळात सत्याग्रह केला होता याचे विडिओ सुद्धा twitter वर शेअर केले जात आहेत. 


त्यावेळी जनसंघाचे अध्यक्ष हे अटलबिहारी वाजपेयी हे होते .त्यांनी या सत्याग्रहात भाषण केले आहे असेही बोलले जात आहे . भारत देशाने बांगलादेशाच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठींबा द्यावा यासाठी हा सत्याग्रह झाला होता त्यावेळी जनसंघाने संसदेवर मोर्चा ही काढला होता तेव्हा बांग्लादेशासाठी भारतात सत्याग्रह झाला होता ही बाब आता खरी मानली जात आहे. आणि नरेंद्र मोदी ही या सत्याग्रहात सहभागी झाल्याचं एका पुस्तकात सांगितलं जातंय 

तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नक्की सांगा 


Post a Comment

Previous Post Next Post