This is a div element with a box-shadow
-->

राजकारण आणि आम्ही | Maharashtra Politics and me

 राजकीय लोकांच्या पाया पडणं गरजेचंच असतं का ?

बऱ्याचदा अनेक राजकीय लोकांच्या आसपास, घरी, ऑफिसला जाणं होतं.
त्यांना भेटायला रोज शेकडो लोक येतात.
त्यातले बरेच लोकं, कार्यकर्ते हे नेता आला की लगेच त्याचे पाय धरतात.
त्यांच्या गोट्या चोळणं, मस्का लावणं,
हा-जी, हा-जी करणं एकवेळ ठीक आहे.
पण पाय धरणं गरजेचंच असतं का ओ ?बरं एकवेळ नेता आपल्या पेक्षा वयाने मोठा असेल तर ठीक आहे,
पण आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या किंवा अंडा एवढ्या त्यांच्या बारकुल्या-बारकुल्या पोरांच्या-पोरींच्या ही पाया पडताना मी अनेकांना पाहिलं आहे.हे कधी स्वतःच्या बापाच्या पाया पडत नाहीत पण यांच्या पाया पडतात.
साला यांचे पाय एवढे पवित्र असतात का ?
काही लोकं तर अधिकाऱ्यांच्या पण पाया पडतात.


मला तर सहसा एखादा बाबा, बुवा, महाराज असला तरी पाया पडावं वाटत नाही.
नतमस्तक व्हावं असे पायच कमी होत चालले आहेत.


अर्थात जो माणूस खरोखर चांगला आहे अन आपल्यापेक्षा वयाने मोठा आहे, त्याचं विशेष काही योगदान आहे त्यांच्या पायी नतमस्तक होणं काही ही गैर नाही किंबहुना ते झालं पाहिजे.आमचा विठ्ठल, देव अमक्या-अमक्या ठिकाणी राहतो.
आरं काय चाललंय हे ..!!
😢😢
- चांगदेव गिते